View allAll Photos Tagged PreventiveHealth
#SamajhKarJiyoBehtar
Do you genuinely care about your #lovedones? Book Preventive #HealthCheckup for them today & ensure their #healthy & happy life.
जग कोविड सोबत संघर्ष करत असताना, दुर्लक्ष झाले ते अन्य आजरांकडे.त्याच आजरांनपैकी लोकांना असेकाही आजारांना तोंड द्यावं लागलं जे कुणाला लवकर सांगता ही येत नाही आणि लपवता ही येत नाही.
या दोन वर्षांच्या काळात,परिस्थिती मूळे बदललेली जीवनशैली आणि आहरामुळे मूळव्याध,फिस्टुला, भगंदर, बांधकोष्टाता असलेल्या रुग्णांमध्ये वाढ दिसली. त्यापैकी बहुतेक लोक कोरोनाव्हायरसच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवेला विलंब करताना दिसलेच व ह्या वर घरगुती उपचार घेण्याचे प्रयत्न करून परिणामी योग्य उपचारानंपासून दूर राहिले.
ही गोष्ट लक्षात घेऊन डॉ अश्विन पोरवाल (संस्थापक-अध्यक्ष, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन ) व डॉ स्नेहल पोरवाल (संस्थापक-सचिव, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन )यांनी दिनांक 01/10/2021 रोजी, शिवदर्शन पर्वती येथे हीलींग हँड्स फाउंडेशन पुणे व आधार फाऊंडेशन पुणे (गिहारा मित्र मंडळ,सत्यविर मित्र मंडळ) यांच्या संयुक्त विद्यमाने, मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिरास ,हिलींग हँडस फाउंडेशन तर्फे मधुरा भाटे (संस्था समन्वयक) व स्मिता झाडे, यांनी रुग्णांना तपासले व आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले व औषधे दिले,आनंद मिसाळ,किरण आरडे,रोहित रगडे, यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
आधार फाऊंडेशन ट्रस्ट चे प्रशांत थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिली, सूरज उर्फ विनोद पवार, गिहारा समाज मित्र मंडळा चे अध्यक्ष यांनी शिबिरासाठी सर्व प्रकारे सहकार्य केले रविभाऊ पवार,वीरेंद्र पवार,संजय पवार,जोगेंद्र माली,विश्वनाथ शिंदे,राजू पवार कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केले.
शिबीर सकाळी 11ते 2 या दरम्यान घेण्यात आले, सदर शिबिरात 66 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.
ह्या आजरांविषयी योग्य माहिती व मार्गदर्शन घरोघरी पोहोचवण्यासाठी हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन सतत कार्यरत आहे.