newsmedianew
१ ऑक्टोबर १७००, औरंगजेबाची उडवली होती दैना
१ ऑक्टोबर १७००
महापूराने औरंगजेबाची उडवली होती दैना
कृष्णा- वारणेच्या पुरांनी मुघलांना घडवली अद्दल
महापूरात औरंगजेबाला अपंगत्त्व
सैन्य, हत्ती-उंट वाहून गेले,
तीनशे वर्षापूर्वीच्या कागदपत्रात नोंदी.
सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सांगली आणि कोल्हापूर जिह्यात आलेल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या महापूराचा फटका मुघलसम्राट औरंगजेबालाही बसला होता. महापूरात त्याची तीन हजार सोन्याची नाणी, शेकडो सैनिक, हत्ती, उंट, घोडे वाहून गेले. माण नदीच्या पूरात तर त्याचा पाय मोडला आणि त्याला कायमचे अपंगत्त्व आले. महापूराने औरंगजेबाची कशी दैना उडविली, याची माहिती देणारी तत्कालीन कागदपत्रे उपलब्ध आहेत. दक्षिण महाराष्ट्रात पंधरवडय़ापूर्वी आलेल्या महापूराने रंकापासून रावापर्यंत सर्वांचीच दैना उडविली. अभूतपूर्व असे नुकसान या महापूराने केले. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी याच दक्षिण महाराष्ट्रात आलेल्या महापूराने मुघलसम्राट औरंगजेबाचीही दैना उडविली होती. त्यावेळी कृष्णा, वारणा आणि माण नद्याला आलेल्या महापूरात औरंगजेबाच्या सैन्याची कशी धुळदाण उडाली, याच्या नोंदी तत्कालीन मुघल अखबारात आणि प्रत्यक्ष महापूर अनुभवलेला तत्कालीन लेखक साकी मुस्तैदखान, खाफिखान यांनी लिहून ठेवलेल्या* वर्णनात केल्या आहेत. प्रसिध्द इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी या अखबारांचे भाषांतर करुन ठेवले आहे.
माण नदीच्या पूरात औरंगजेबाला अपंगत्त्व
सन१७०० च्या एप्रिल महिन्यात सातारा किल्ला जिंकल्यानंतर औरंगजेब मिरजेकडे येण्यास निघाला. तो भूषणगड, कलेढोण, झरे, आटपाडी मार्गे १२सप्टेंबर रोजी खवासपूरला पोहचला. त्यावेळी १ ऑक्टोंबर १७०० रोजी माण नदीला अचानक पूर येऊन औरंगजेबाच्या छावण्या वाहून गेल्या. यामध्ये शेकडो सैनिक, उंट, हत्ती वाहून गेले.
##nagpurnews ##punenews ##ahmednagarnews ##aurangabadmarathinews ##aurangabadnews ##bharat ##desh ##governmentofindia ##india ##indianews ##kolhapurmarathinews ##kolhapurnews ##konkanmarathinews ##konkannews ##latestmarathinews ##latestmumbainews ##latestnewsinmarathi ##maharashtranews ##maharashtranewsheadlines ##maharashtrapoliticsnews ##maharashtratoday ##marathibatamya ##marathibreakingnews ##marathinews ##marathinewsportal ##mumbainews ##nashiknews ##navimumbainews ##newsheadlinesmaharashtra ##newsportal ##onlinemarathi ##punenewstoday ##raigadnews ##ratnagirimarathinews ##Sangli ##sanglinews ##satara ##sataralive ##sataranews ##solapur ##solapurnews ##thanelive ##thanemarathinews ##thanenews ##thanevarta ##todaynewsinmarathi postboxindia.com/today-in-history-14/