Back to photostream

आज - अभियंता दिन.

रायगड किल्ला बांधणी करणारे हिरोजी ईंदुलकर

 

हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगडचे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले. आत्ताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य हिरोजी इंदुलकरांकडे होते .

हिरोजी इंदुलकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले .रायगडाचे बांधकाम हा त्यांच्या कौशल्याचा पुरावा आहे .आता जो रायगड पाहायला मिळतो तो फक्त शिवकाळातच असू शकतो. आणि त्या शिलालेखा प्रमाणे आजही रायगड पाहायला मिळतो.

अगदी सुरूवातीच्या काळापासून हिरोजी ईंदुलकर किल्ले बांधकामात तज्ञ म्हणून प्रसिद्ध होते.हिरोजी ईंदुलकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले.

शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील प्रासाद, उद्याने, राजपथ ,स्तंभ ,गजशाला ,नरेंद्रसदन बारा महाल अशा अनेक इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादी बांधकाम करण्याचे काम त्यांच्या हाती दिले होते .आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली होती. गड,किल्ले बांधण्याचे काम हिरोजी आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेत होते.हिरोजीने बांधकाम करत असताना किल्ला निम्म्यावर बांधत आणला आणि पैसे संपले .हिरोजीना समजेना काय करावे ,महाराजांनी तर जबाबदारी टाकली आहे ,किल्ला तर पूर्ण केला पाहिजे तर पैसा शिल्लक नाही. हिरोजीने अपूर्ण काम पूर्ण केले .आपला राहता वाडा ,आपली जमीन विकून बायका-मुलांसह रायगडावर राहायला आले .पैसा नसल्यामुळे ते झोपडी करून राहू लागले .आणि मराठ्यांची राजधानी त्यांनी पूर्ण बांधून काढली.

 

##engineerday ##fort ##hirojiindulakar ##raigad ##shivaji ##इतिहास ##छत्रपती ##छत्रपती#शिवाजी#महाराज#इतिहास#मराठे#इतिहास#संशोधन#मराठा#स्वराज्य#देश ##देश ##मराठा ##मराठे ##महाराज ##शिवाजी ##संशोधन ##स्वराज्य postboxindia.com/today-in-history-4/

36 views
0 faves
0 comments
Uploaded on September 16, 2020